Ticker

6/recent/ticker-posts

अखेर उपोषणाचा तीळा सुटलय

रवि बारसागांडी सिरोंचा तालुका प्रतिनिधि 
✍️सिरोंचा: तालुका मुख्यालयात मागील ४ वर्षांपासून  छत्रपती शिवाजी महाराज चौक ते फारेस्ट गार्डन पर्यंत मुख्य रस्त्यावर मोठ-मोठे खड्डे पडून येणाऱ्या जाणाऱ्या नागरिक,शालेय विध्यार्थी,गर्भवती महिला, वृध्दांना,आणि वाहन धारकांना नाहक त्रास सहन करावा लागत असून आतपर्यंत खूप अपघात सुद्धा झालेले आहे. पुढे खड्डे असेच राहिला तर जीवितहानीसुध्दा होण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणून या गंभीर समस्याला घेऊन आ.शरदचंद्रजी पवार साहेब यांचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा अध्यक्ष - अतुल भाऊ गण्यारपवार तालुका अध्यक्ष - फाजील पाशा ,जिल्हा सरचिटणीस - चोक्कमवार यांच्या मार्गदर्शनाखाली पक्षाचे तालुका उपाध्यक्ष - सागर मूलकला यांच्या नेतृत्वाखाली पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहून तहसीलदार यांना निवेदन देऊन तात्काळ खड्डे बुजविण्याचे मागणी केली.
        परंतु सादर महोदयांनी मागणीकडे दुर्लक्ष केल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा पदाधिकाऱ्यांनी या  समस्येला गांभीर्याने घेऊन तालुक्यातील जनतेच्या हितासाठी समोर येऊन संवेदनशील विषयावर तोडगा काढण्यासाठी तहसील कार्यालयासमोर बेमुदत साखळी उपोषणाला सुरुवात करण्यात आली..
          सहा दिवसांचा साखळी उपोषणांतर सातव्या दिवशी उपोषणाची दखल घेऊन  तहसीलदार महोदयांनी  संबंधित विभागाचे बैठक बोलावून सदर  बैठकीत १) छत्रपती शिवाजी महाराज चौक ते नंदनवन फारेस्ट गार्डन पर्यंत  २) तहसील कार्यालय ते पंचायत समिती चौकापर्यंत ३) छत्रपती शिवाजी महाराज चौक ते BRO चौकापर्यंत ४) नगरम चौक ते बस स्टँड चौकापर्यंत व ५) ग्रामीण रुग्णालयापासून ते क्रीडा संकुल चौकापर्यंत असलेल्या खड्डे बुजविण्याचे आदेश दिल्याने संबंधित विभागातील अधिकाऱ्यांनी खड्डे बुजविण्याचा कामाला सुरुवात केलेली आहे.
      या संवेदनशील कामाविषयी शहर व तालुक्यातील जनतेकडून व नागरिकांकडून ,शालेय - महाविद्यालयीन विद्यार्थ्यांकडून 
 कार्यालयाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून नवनिर्वाचित शरद पवार यांचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे कौतुक केले जात आहे.. यापुढेही जनतेचा हिताचे कामासाठी राष्ट्रवादी पक्षाच्या वतीने पुढाकार घेऊन अवश्य प्रयत्न करत राहील अशी ग्वाही राष्ट्रवादी पक्षाचा वतीने देण्यात येत आहे..

Post a Comment

0 Comments