Ticker

6/recent/ticker-posts

अहेरी येथील ठाकरे परिवाराचा महालक्ष्मीचे राजे अम्ब्रिशराव आत्राम यांनी केले दर्शन तथा पूजन.

रवि बारसागांडी तालुका प्रतिनिध सिरोंचा:✍️महालक्ष्मी अर्थात ज्येष्ठा कनिष्ठा गौरींचं आगमन काल झाले आहे. अहेरीचा माजी नगराध्यक्षा हर्षाताई रवींद्र ठाकरे यांचा पॉवर हाऊस कॉलनीतील घरी माजी पालकमंत्री मा. राजे अम्ब्रिशराव आत्राम यांनी काल सदिच्छा भेट देऊन माता महालक्ष्मीचे दर्शन तथा पूजन केले.देवी गौरी गणेशाची आई पार्वतीचे दुसरे नाव आहे. देवी गौरीचे घरामध्ये आगमन आरोग्य, संपत्ती, सुख-समृद्धी घेऊन येते. आपापल्या परंपरेनुसार ज्येष्ठा आणि कनिष्ठा अशा गौरीच्या दोन मूर्ती, चित्र किंवा खडे घरी आणून त्यांची पूजा केली जाते, ठाकरे परिवारात ही महालक्ष्मी पूजनाची जुनी परंपरा आहे..!!अश्याच पद्धतीने मोठ्या उत्साहात प्रत्येकांच्या घरी गौरी महालक्ष्मीचे आगमन झाले असून दरवर्षी प्रमाणे राजेंनी ठाकरे परिवाराचा घरी काल भेट देत माता महालक्ष्मीचे पूजन केले ह्यावेळी उपस्थित ठाकरे परिवाराशी राजेंनी बराचवेळ आस्थेने संवाद साधला..!


Post a Comment

0 Comments