Ticker

6/recent/ticker-posts

ग्रामिण भागातिल सार्वजनिक शौचालय झाले शोपीस


रवि बारसागांडी सिरोंचा तालुका प्रतिनिधि 
✍️सिरोंचा
ग्रामीण भागातील गावागावात शौचालय व मुत्रीघरांच्या बांधकाम सुरुवात करण्यात आली होती. मात्र, जिल्ह्यातील ग्रामीण भागातील नागरिक या शौचालय व मुत्रीघराचा वापरच होत नसल्याचे दिसून येत आहे.
ग्रामीण भागामध्ये गावे हागणदारीमुक्त करण्यासाठी शौचालय व मुत्रीघर बांधण्याचे उद्दिष्ट देण्यात आले होते. त्या अनुषंगाने शासनाने बऱ्याच गावी शौचालये व मुत्रीघर बांधलेले आहेत. पण गावातील लोकांची अजूनपर्यंत पाहिजे त्या पद्धतीची मानसिकता बनली नाही. त्यामुळे अनेक नागरिक उघड्यावरच शौचालयाचा व लघवी करण्यासाठी जात आहेत. त्यामुळे सार्वजनिक शौचालय व मुत्रीघराचा वापरच गावकरी करीत नसल्याने या इमारती बेवारस स्थितीत आढळून येत



आहेत. विशेष म्हणजे, या गावांतील ग्रामपंचायत प्रशासन सुद्धा अनेक वर्षांपासून याकडे कानाडोळा करीत असल्याने शासनाचे लाखो रुपये लावून बांधलेल्या इमारती दयनीय अवस्थेत आढळून येत आहेत.
या इमारतीच्या अवतीभवती लहान मोठे झुडपांचे साम्राज्य तयार झाले असून गावांतील लोक याच ठिकाणी कचरा आणून टाकीत असतात त्यामुळे या परिसरात सर्वत्र या कचऱ्यामुळे दुर्गंधी पसरली असते. परिणामी रोगराईला निमंत्रण दिल्यासारखे होत आहे

Post a Comment

0 Comments