Ticker

6/recent/ticker-posts

मेरी माती मेरा देश अभियानांतर्गत 191 बटालियन तर्फे देसाईगंज परिसरातील निवृत्त जवानांचा केला गेला सन्मान*

✍️देसाईगंज* :11/08/2023 रोजी 191 बटालियन मुख्यालय देसाईगंज येथे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव मेरी माती मेरा देश कार्यक्रमांतर्गत सेवानिवृत्त जवानांचा सन्मान करण्यात आला. यावेळी श्री आलोक अवस्थी, द्वितीय कमांड अधिकारी श्री उमाशंकर प्रसाद (उप. कमाण्डेन्ट)आणि त्यांच्या पत्नी श्रीमती शोभा राणी व अधीनस्थ अधिकारी आणि जवान तसेच स्थानिक अधिकारी श्री मुनेश्वर गेडाम (तहसीलदार वडसा), किरण रासकर (एसएचओ वडसा) आणि सखीमंच ,या सत्कार समारंभाला वडसा येथील महिलां व्यतिरिक्त स्थानिक नागरिक व विशेष अतिथी जसे H C/GD कैलास बालाजी बाहेकर , HC/GD नानवटकर नरेश हरिभाऊ , HC/GD अमरदीप मेश्राम, HC/GD वासनिक सचिन देविदास आदी देसाईगंज परिसरातील उपस्थित होते. यावेळी सेंकण्ड इन कमांडेण्ड श्री


 आलोक अवस्थी यांनी सर्व अधिकारी, कर्मचारी, स्थानिक नागरिक, सखी मंच च्या महिला आणि विशेष पाहुणे आणि त्यांचे कुटुंबीय यांना शुभेच्छा दिल्या आणि स्मृतिचिन्ह, पुष्पगुच्छ व शाल देऊन त्यांचा सत्कार केला. विशेष पाहुणे आणि त्यांनी दलामध्ये  केलेल्या सेवांचे कौतुक केले आणि त्यांना सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले. यावेळी विशेष पाहुण्यांच्या हस्ते वृक्षारोपणही करण्यात आले. या संदर्भात श्री आलोक अवस्थी (सेकण्ड इन कमांण्डेन्ट )यांनी सांगितले की, मेरी माती मेरा देश अभियान 09 ऑगस्ट पासून साजरे केले जात आहे. संपूर्ण देशामध्ये शीला फलक, पंच प्राण प्रतिज्ञा, अमृत वाटिकेची स्थापना, वीरांची पूजा इत्यादी कार्यक्रम केले जात आहेत. सखीमंच ची महिला वीरनारी च्या सहकार्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या , शूर स्वातंत्र्यसैनिक आणि वीरांचा सन्मान करणे हा या मोहिमेचा मुख्य उद्देश आहे. ज्यांनी देशाच्या सेवेत अमूल्य योगदान दिले. कार्यक्रम समाप्ती नंतर सर्व सदस्यांना स्नेहभोजन चे आयोजन केले गेले होते .

Post a Comment

0 Comments