Ticker

6/recent/ticker-posts

माजी आमदार दिपकदादा आत्राम यांच्या कडून रंजना जंगमवार यांना शस्त्रक्रिये साठी आर्थिक मदत.

अहेरी◆* : *तालुक्यातील आलापल्ली येथील कु.रंजना जंगमवार  यांना कॅन्सर सदृश्य या गंभीर आजाराने त्रस्त असून घरची परिस्थिती अत्यंत हलाकीची आहे, उपचार घेण्यास अडचण होत आहे. म्हणून आज कु.रंजना जंगमवार यांनी आलापल्ली येथे भारत राष्ट्र समितीचे नेते,आदिवासी विद्यार्थी संघाचे विभागीय अध्यक्ष तथा माजी आमदार दिपकदादा आत्राम यांच्या निवासस्थानी भेट घेऊन आपली परिस्थिती सांगीतल्यावर माजी आमदार दिपकदादा आत्राम यांनी शस्त्रक्रिया व उपचारासाठी आर्थिक मदत केले.*
    *या वेळी आविस सल्लागार तथा जाफराबाद ग्राम पंचायत सदस्य बिचमय्याजी कुडमेथे,जाफराबाद ग्राम पंचायत माजी उपसरपंच तिरुपती दुर्गम,आविस पदाधिकारी साई मंदा,जाफराबाद ग्राम पंचायत सदस्य रमेश घोडाम,सुनील जंगमवार,रवी जंगमवार,जुलेख शेख,विनोद कावेरी उपस्थित होते.*

Post a Comment

0 Comments