Ticker

6/recent/ticker-posts

*डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती पर्वावर- मित्रमंडळ परिवाराचा स्तुत्य उपक्रम*

✍️*देसाईगंज* - शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या देसाईगंज येथील दीक्षाभूमीवर विश्वरत्न, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्याकरिता बाबासाहेबांचे लाखो अनुयायांची गर्दी या ठिकाणी उसळत असते.  भिमजयंती साजरी करण्यासाठी अनेक राजकीय व सामाजिक क्षेत्रातील,

लोकसहभागातून विविध प्रकारचे उपक्रम राबविले जातात. परंतु देसाईगंज येथील मित्रमंडळातर्फे यावर्षीपासून आंबेडकर जयंती निमित्त दीक्षाभूमिवर आलेल्या अनुयायांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी हजारो अनुयायांनी या महाप्रसादाचा लाभ घेतला. या महाप्रसादाचे आयोजक भ्रष्टाचार उन्मुलन समितीचे सदस्य घनश्याम कोकोडे, साईबाबा देवस्थानचे संस्थापक मिलिंद सपाटे, युवक काँग्रेस कमिटी चे तालुकाध्यक्ष पंकज चहांदे,  सामाजिक कार्यकर्ते देवाजी शेंडे,  सामाजिक कार्यकर्ते महेंद्रसिंग मक्कड, बहादुर सरोदे, शुभम सपाटे जीडीसीसी बँक, रितेश नागदेवे साई एजेंशी आदींचा मित्रमंडळ यांचा सहभागातून  महाप्रसादाचा आयोजन करण्यात आले.

Post a Comment

0 Comments