Ticker

6/recent/ticker-posts

देसाईगंज सिटी सर्वे चे ग्रहण कधी सूटनार

 

देसाईगंज नगर परिषदअंतर्गत  सिटी सर्वे चे काम उपाध्यक्ष भूमी अभिलेख कार्यालय वडसा या मार्फत २०१८ पासून कासवाच्या गतीने सुरू आहे, देसाईगंज नगर परिषद शहराचा नकाशा उपलब्ध असावा करिता नगर भूमापन करण्याकरिता भूमी अभिलेख कार्यालयाकडे त्याची मागणी नुसार ३ कोटी ४८ लाख रुपया पैकी ३ जानेवारी २०१८ ला २ कोटी ५० लाख व ६ जुलै २०१८ रोजी ३ लाख रुपये तसेच १९ डिसेंबर २०१८ रोजी २५ लाख रुपये भरणा केला सदर कामाचे उदघाटन तत्कालित जिल्हाधिकारी शेखर सिंग तसेच माननीय आमदार कृष्णाजी गजभे यांचे हस्ते व ९ एप्रिल २०१८ रोजी उदघाटन करण्यात आले सिटी सर्वे चे संपूर्ण काम १८ महिन्यात करून देण्याचे जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख यांनी मान्य केले परंतु आज रोजी जवळपास ५ वर्षाचा कालावधी होत आहे.

तरी सदर काम पूर्ण झाले नाही या यामुळे गरीब नागरिकास प्रधानमंत्री आवास योजना,रमाई घरकुल योजना,शबरी आवास योजना इत्यादी योजना पासून वंचित राहण्याची वेळ आली आहे.तसेच सिटी सर्वेचे काम न झाल्यास शासकीय जमिनीवर अतिक्रमण होत आहे, तरी या बाबीकडे संबंधित विभागाने लक्ष न दिल्यास देसाईगंज येथे नागरिक आंदोलनाचा तयारीत आहेत, तसेच सामाजिक कार्यकर्ता राकेश राखडे उपोषनाचे हत्यार बसण्याच्या तयारीत आहेत.

Post a Comment

0 Comments