Ticker

6/recent/ticker-posts

* डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरा* *माजी जि प अध्यक्ष भाग्यश्रीताई आत्राम यांची उपस्थिती*

✍️सिरोंचा:-  जाफराबाद येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाचे उदघाटन माजी जि प अध्यक्ष भाग्यश्रीताई आत्राम यांच्याहस्ते करण्यात आले.यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे सिरोंचा तालुकाध्यक्ष मधुकर कोल्लूरी,राष्ट्रवादी काँग्रेसचे सिरोंचा तालुका उपाध्यक्ष सत्यम पिडगू,राकॉचे जिल्हा उपाध्यक्ष रामकीष्टु नीलम, उपसरपंच स्वामी गोदारी,वेंकटी डोंगरे,ज्योती डोंगरे,रोशक्का झाडे,वेंकटी गावडे,चंद्रय्या दुर्गम, चिनक्का दुर्गम,नारायण झाडे,अशोक मूडमडगेला,सुधीर मूडमडगेला,महेश दुर्गम,किष्टय्या निश्टूरी आदी उपस्थित होते.
मान्यवरांच्या हस्ते डॉ बाबासाहेब आंबेडकर व तथागत गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून वंदन करून ध्वजारोहण करण्यात आले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती जाफराबाद येथील सर्व बौद्ध उपासक तथा उपासिका यांनी सहकार्य केले.यावेळी गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Post a Comment

0 Comments