Ticker

6/recent/ticker-posts

आम आदमी पार्टी देसाईगंज चा नप महानिवेदन


✍️देसाईगंज:देसाईगंज नगर परिषद क्षेत्रात विविध प्रभागात मोठ्या प्रमाणात समस्या आहेत. मात्र नगर परिषदेचे व नगरसेवकांचे दुर्लक्ष होत असल्यामुळे निराकरण होत नाही, 
(1)प्रभाग क्रमांक एक येथील नागरिकांची मागणी आहे की लवकरात लवकर बगीच्या नवीन बांधकाम, नालीचे काम, नळ

कनेक्शन, क्रीडांगण, इलेक्ट्रिक पोल, मोठे पथदिवे, या बराच काळ प्रतीक्षा करूनही या समस्या सोडवण्यात आलेल्या नाही, पावसाळ्यात नाला तुडुंब भरतो, नदीचे पाणी घरात शिरते, तरीही कोणतीही समस्या या प्रभागातील सोडवल्या जात नाही. प्रभाग क्रमांक एक मधील सर्व नागरिकांची मागणी आहे की नगर परिषदेने लवकरात लवकर
या समस्या सोडवाव्या.( 2) प्रभाग क्रमांक दोन देसाईगंज येथील नागरिक प्रभागातील समस्यांनी वैतागले असून रोडवरील पडलेले मोठे मोठे खड्डे. पतदिव्य नसल्याने अपघात होण्याची शक्यता आहे. नागरिकाची मागणी आहे की व्यायाम शाळा, सभागृह, नाली बांधकाम, मोठेपतदिवे, क्रीडांगण अशी एकही व्यवस्था प्रभाग क्रमांक दोन मध्ये नाही तरी ही व्यवस्था नगरपालिकेने लवकरात लवकर करून देण्यात यावी.( 3) प्रभाग क्रमांक तीन देसाईगंज वडसा येथील आरोग्य सेवा शून्य प्रमाणात दिसून आलेली आहे. शाळेची पाहणी केलेली 

असता शाळा तूट फूट अवस्थेत आहे. शाळेच्या क्रीडांगणात इलेक्ट्रिक पोल नाही. पथदिये बंद अवस्थेत आहे. शाळेतील शुद्ध पिण्याचे पाण्याची व्यवस्था नाही. शाळेसमोर स्पीड ब्रेकर नाही. रस्ते टूट फूट अवस्थेत आहे. इलेक्ट्रिक पोल मोठे पतदिये आरोग्यांच्या समस्या अशा बऱ्याच काही समस्यांना वार्डातील लोकांना सामोरे जावे लागते.वार्डतिल

नागरिकांची मागणी आहे की आमच्या समस्यांचा समाधान लवकरात लवकर करून देण्यात यावे.
(4) देसाईगंज वडसा प्रभाग क्रमांक चार येथे पाहणी केली असता तुटपुट अवस्थेत नाली आहे. नालीच पाणी रस्त्यावर वाहताना दिसत आहे. अशातच प्रभाग क्रमांक चार येथील नागरिकांचा आरोग्य धोक्यात येत आहे. नाली वरील झाकण बसवणे, नालीची दुरुस्ती करणे, इलेक्ट्रिक पॉल, मोठे पथदिये नळ कनेक्शन घरकुल अशा बरेचसे समस्या आढळून आलेल्या आहे. प्रभाग क्रमांक चार येथे दुर्गधीचे वातावरण निर्माण झालेले आहे.
(5)प्रभाग क्रमांक पाच या प्रभागाला महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर या नावाने ओळखले जाते. आंबेडकर वार्डातील मुख्य रस्ता जरी सिमेंट  झालेला असला तरी वार्डाच्या आत एकही रस्ता सिमेंट चा झालेला नाही. नाली बांधकाम झालेले नाही. नाली वरील पाणी सांडपाणी रस्त्यावरील वाहतांनी दिसते. रस्त्यावरील पथदिवे हे नादुरुस्त आहे. आणि बंद अवस्थेत आहे. याचा कामगार महिलांना त्रास सहन करावा लागतो. उन्हाळा काही दिवसावर येऊन ठेपलेला आहे. आणि नळाचे पाणी नियमित मिळत नाही. येणाऱ्या काळात जलसंकट येण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा बऱ्याचशा समस्या चे निवारण करून देण्यात यावे.

(6) वार्ड क्रमांक सहा देसाईगंज वार्ड क्रमांक सहा है आरमोरी रोडच्या मुख्य रस्त्यालगत प्रभाग असून या भागात मुस्लिम व सर्व जाती धर्माचे लोक वास्तव्यास आहेत, तरीही शासकीय सुविधेने अपूर्ण आहे मुस्लिम बांधवाची गडचिरोली जिल्ह्यातील देसाईगंज वडसा येथील सर्वात मोठी मस्जिद समजल्या जाते. नाली तूट फूट अवस्थेत आहे. नालीची दुर्गंधी येत असते. येथील नागरिकांची मागणी आहे बगीच्याचे सौंदर्यकरण, सिमेंट रोड, नाली बांधकाम, मोठ्या प्रकाश झोताचे पथदिवे, नळ कनेक्शन व व्यायाम शाळा या सर्व मागण्या प्रभाग क्रमांक सहा मधील नागरिकांनी मांडलेल्या आहे.

(7) देसाईगंज येथील प्रभाग क्रमांक सात मधील समस्या आहेत नागरिकांनी सिमेंट रोडचा प्रस्ताव मांडला असून डांबरींगचे निकृष्ट दर्जाचे काम केले आहे. तरी सिंधी समाजातील नागरिकांनी त्याची तक्रार केली असताना डाम्बरींगची निकृष्ट दर्जाचे काम करण्यात आले आहे.हे रोड सीमेंटीकरण करण्यात यावे व आवश्यकता नसतानी जागोजागी गतिरोधक बसवण्यात आले आहे, या भागातील नागरिकांची मागणी आहे की पिण्याच्या पाण्याची अनियमितता आहे,मोठे प्रकाश झोताचे पथदिवे बसवण्यात यावे.

(8) प्रभाग क्रमांक आठ विर्शी हेटी देसाईगंज  हेटी येथील जास्तीत जास्त लोक मोलमजुरी करणारे आहे वडसा बाजारपेठ बंद झाल्यानंतर रात्री महिलांना पायदळ यावे लागते. विर्शी इथे पतदिव्य नसल्याने भीतीदायक आहे. रात्री पायदळ प्रवास करावा लागतो अशातच पथदिवे सिमेंट रोड नाली बांधकाम अशा प्रचंड मूलभूत सुविधेचा अभाव दिसून येत आहे. तरी विर्शी हेटी येथील नागरिक व महिला वर्ग या सुविधेपासून वंचित आहे तरी शासनाने या सुविधा उपलब्ध करुन देण्यात याव्या.

(9) जुनी वडसा प्रभाग क्रमांक नऊ येथील नागरिकांची मागणी आहे की लवकरात लवकर पाण्याची टंकी बसवण्यात यावी

उन्हाळा सुरू होताच छोटी मोटर टिल्लू पंप लावल्याशिवाय पाणी मिळत नाही. पिण्याच्या पाण्यासाठी भटकावे लागते,

उन्हाळा येताच पिण्याच्या पाण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागते, जुनी वडसा येथील नागरिकाची मागणी आहे

की लवकरात लवकर पाण्याची टँक, तलावाचे सौंदर्यकरण, सिमेंट रोड, विद्युत पोल मोठे पयदिये अशा समस्या
नागरिकांनी मांडलेल्या आहे.

(10) प्रभाग क्रमांक दहा नैनपुर देसाईगंज नैनपुर तलावाचे सौंदर्यकरण करण्यात यावे व तलावाच्या वरील सिमेंट रोड, विद्युत खांब, मोठे पथदिवे, नळ कनेक्शनचे ,मोठे पाईप लाईन याकरिता नगरपालिकेला आम आदमी पक्षातर्फे निवेदन देण्यात आले होते, सिमेंट रोडचा मुद्दा जोर धरताच तलावावरील सिमेंट रोडचे चाल चलो काम करण्यात आले, यासोबत नाली बांधकाम घरकुल मोठे पथदिवे नळाची मोठी पाईपलाईन हे सर्व रखडलेले आहे. तरी नैनपुर येथील नागरिकांची मागणी आहे की लवकरात लवकर या समस्यांना सोडवण्यात यावे, तसेच विशी वार्डात पानी टंकी लावण्यात यावी व शहरातील आरमोरी रोड कुरखेडा रोड, चुना फैक्टरी बायपास रोड, आदर्श स्कूल से गजानन मंदिर असे अनेक ठिकाणी शेकडो स्ट्रीट लाइट बंद आहेत है स्ट्रीट लाइट लवकरात लवकर दुरुस्त करण्यात यावे अशी अनेक समस्या आम आदमी पार्टी तर्फे देसाईगंज शहरातील दहा (10) ही प्रभागातील निवेदनात  करण्यात आली आहे,निवेदन देताना

देसाईगंज आप चे तालुका अद्यक्ष भरत दयलानी,शहर अद्यक्ष आशीष घुटके, सलाहगार दीपक नागदेवे,तबरेज खान, प्रमोद दहिवले, सौरव सहारे,अतुल ठाकरे, डॉक्टर सोनपुरे,बारकृष्ण भंडारकर, शिल्पा बोरकर, सागर मेश्राम, देवा जांभुळकर, सिद्धार्थ गनवीर, फारूक पटेल, सुशील केशवानी,व आप देसाईगंज चे अनेक कार्यकर्ता उपस्थित होते

Post a Comment

0 Comments