Ticker

6/recent/ticker-posts

व्हॉईस ऑफ मीडिया संघटनेचा पंचसूत्री कार्यक्रम पत्रकारांसाठी कल्याणकारी - जिल्हा माहिती अधिकारी सचिन अडसूळ गडचिरोली येथील कौटुंबिक स्नेहसंमेलनात 34 पत्रकारांना 10 लाखाचा विमा प्रदान

गडचिरोली : व्हॉईस ऑफ मीडिया संघटनेची देशभरातील व्याप्ती आणि त्यांनी मांडलेला पंचसूत्री कार्यक्रम हा पत्रकारांसाठी कल्याणकारी असल्याचे मत गडचिरोली जिल्ह्याचे माहिती अधिकारी सचिन अडसूळ यांनी व्यक्त केले. शहरातील हॉटेल लेक विव्यूमध्ये व्हॉईस ऑफ मीडिया गडचिरोली शाखेचा कौटुंबिक स्नेह संमेलनात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. यावेळी अध्यक्ष म्हणून ज्येष्ठ पत्रकार रोहिदास राऊत, विदर्भ प्रमुख मंगेश खाटीक, राष्ट्रीय कार्यालयीन सचिव दिव्या भोसले, चंद्रपूरचे जिल्हाध्यक्ष संजय पडोळे, गडचिरोली जिल्हाध्यक्ष व्यंकटेश दुडमवार मंचावर उपस्थित होते. यावेळी ३५ पत्रकारांना दहा लाखांचा विमा प्रदान करण्यात आला.अडसूळ पुढे म्हणाले की, देशभरात पत्रकारांसाठी अनेक संघटना कार्यरत आहेत. त्यापैकी व्हॉईस ऑफ मीडिया संघटनेने पत्रकाराच्या कल्याणासाठी विमा, घरे, सेवानिवृत्ती योजना, पाल्यांच्या शिक्षणासाठी सहाय्य, नवे तंत्रज्ञान शिकवणी या सारख्या पंचसूत्री कार्यक्रम प्राधान्याने राबवण्यासाठी आश्वासक पाऊल उचलले, हे कौतुकास्पद असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. विदर्भ अध्यक्ष मंगेश खाटीक यांनी संघटनेच्या कार्याच्या लेखाजोखा मांडला. सोबतच सदस्यांना भविष्यातील योजनेबद्दल मार्गदर्शन केले. राष्ट्रीय कार्यालयीन सचिव दिव्या भोसले यांनी कौटुंबिक स्नेह संमेलन का घेण्यात यावे याबद्दल उपस्थित सदस्यांना व त्यांचा कुटुंबाला मार्गदर्शन केले. सोबतच व्हॉईस ऑफ मीडियाच्या भविष्यातील योजनेबद्दल अवगत करून दिले. कार्यक्रमाचे अध्यक्ष रोहिदास राऊत यांनी संघटनेच्या कार्याचे कौतुक करत सदस्य म्हणून सहभागी झाले. यावेळी त्यांची राष्ट्रीय उपाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. कार्यक्रमाला आलेल्या पाहुणे व पत्रकारांचा यावेळी सत्कार करण्यात आला. यावेळी लोकसत्ताचे पत्रकार सुमित पाकलवार व पुण्यनगरीचे पत्रकार प्रल्हाद म्हाशाखेत्री यांची विदर्भ कार्यकारीणीमध्ये निवड करण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सूरज हजारे तर आभार प्रदर्शन लोकमत समाचार चे जिल्हा प्रतिनिधी हरीश शिडाम यांनी केले होते.

कार्यक्रमाला व्हॉईस ऑफ मीडिया जिल्हा सचिव कैलाश शर्मा, लोकमतचे जिल्हा प्रतिनिधी संजय तीपाले, मुकुंद जोशी, नरेंद्र महेश्वरी, रेखा वंजारी, जयंत निमगडे,  राजू सहारे, कृष्णा वाघाडे संदीप कांबळे, अनिल गुरणुले, शरीफ कुरेशी, गणेश शिंगाडे मुकेश गेडाम, अनुप मेश्राम, यांच्या सह
दैनिक, साप्ताहिक इलेक्ट्रॉनिक आणि डिजिटल मीडियाच्या पत्रकारांसह वितरक सुध्दा या कार्यक्रमात सहभागी झाले होते. 
....................

Post a Comment

0 Comments